24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातूर ग्रामीणमध्ये अडीच कोटीच्या कामांना हिरवा कंदील

लातूर ग्रामीणमध्ये अडीच कोटीच्या कामांना हिरवा कंदील

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे २०२१ नंतर मंजुरी दिलेल्या विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्ये अडीच कोटीच्या विकासकामांना आता हिरवा कंदील मिळाला आहे. या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार धिरज देशमुख यांचे आभार मानले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजुरी दिलेल्या कामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत त्यांनी विकासकामांवरील स्थगिती मागे घेतली. याबाबतचा अध्यादेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यानुसार लातूर तालुक्यात काटगाव येथे दर्गा, मस्जिद परिसरात सभामंडप, निवळी येथे निळकंठेश्वर मंदिर परिसरात सभागृह, चिंचोलीराववाडी येथे हनुमान मंदिर परिसरात सभागृह व प्रसाधन गृह, नागझरी येथे नागोबा मंदिर परिसरात भक्त निवासस्थान बांधकाम तर औसा तालुक्यातील बोरगाव न. येथे नकुलेश्वर मंदिर परिसरात सभागृह, टाका येथे भीमाशंकर मंदिरासमोर सभागृह, अंदोरा येथे आम्रशाली बाबा दर्गा येथे भक्त निवास, उटी बु. येथे जगदंबा देवी मंदिरासमोर छबिना मार्गाचा रस्ता, सिमेंट – पेव्हर ब्लॉक रस्ता होणार आहे.
 रेणापूर तालुक्यातील माणूसमारवाडी येथे बालाजी मंदिर परिसरात सभागृह, शेरा येथे दावल मलिक दर्गा परिसरात सभागृह, दर्जी बोरगाव येथे चिन्मयानंद स्वामी मंदिर परिसरात भक्त निवास व शौचालय बांधकाम आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये रेणुकादेवी मंदिराचे पश्चिम गेटचे बांधकाम व दर्शन रांगेसाठी दुस-या मजल्यावर सभागृह बांधणे… अशी विकासकामे होणार आहेत. अनियमितता टाळून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पर्यटन विभागाने दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR