17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातूर ग्रामीणमध्ये धिरज देशमुख यांची प्रचारात मुसंडी

लातूर ग्रामीणमध्ये धिरज देशमुख यांची प्रचारात मुसंडी

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणमधील कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतलेली आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रणिती शिंदे, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्यासह प्रमुख महिला नेत्या, पदाधिक-यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा घेऊन महिला शक्त्तीचे बळ दाखवितानाच प्रसिध्द सिने अभिनेते आणि आमदार धिरज देशमुख यांचे मोठे बंधू रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये युवकांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी केलेले भाषण आणि युवकांमध्ये वाढविलेला उत्साह हे पाहता लातूर ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार धिरज देशमुख यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, मतदारसंघातील गाव न गाव पिंजून काढले जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते कामाला लागलेले असतानाच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा पदाधिकारीही गावोगावी डोअर टू डोअर प्रचार करून वातावरण निर्मिती करीत आहेत. विशेष म्हणजे गावोगावी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यात युवक कार्यकर्तेही चांगलेच कामाला लागला आहे.
प्रसिद्ध सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत नुकताच लातूर येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील युवकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी त्यांनी धिरज देशमुख यांना लाखाच्या लिडने निवडून आणण्याचे आवाहन केले. अभिनेते रितेश देशमुख यांचे उत्साह आणि जोशपूर्ण भाषण आणि या भाषणाला युवकांमधून मिळणारी उत्स्फूर्त दाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला. हाच उत्साह आणि संदेश घेऊन लातूर ग्रामीणमधील युवा कार्यकर्ते आपापल्या गावात परिसरात कामाला लागले असून, आता डोअर टू डोअर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. एकीकडे प्रमुख गावांत प्रचारसभा आणि दुसरीकडे गावोगावचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रचाराच्या कामाला लागल्याने सर्वत्र चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे या प्रचारकार्याला सर्व गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR