20.9 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeलातूरलातूर ग्रामीणमध्ये बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर ग्रामीणमध्ये बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण  विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कॉग्रसचे उमेदवार आ धिरज  विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी रेणापूर तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते  मतदारसंघात डोअर टू डोअर  जाऊन  मतदारांशी भेट घेत आहेत. बैठका, कार्नर बैठकांना व  रॅलीलाही  मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे.
          गेल्या पाच वर्षात  लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील प्रश्नासाठी सभागृहात आवाज उठवून  गावागावात  विविध विकासाच्या योजना राबवून  गावाचा विकास केला. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत कॉग्रेस महाविकास आघाडी कडून आ. धिरज विलासराव देशमुख यांना दुस-यांदा संधी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी व भरल्यानंतर आ. धिरज देशमुख यांनी  मतदारसंघातील गावागावात बैठका, कार्नर बैठकातून मतदारांशी संवाद साधत मतदानरूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन केले.
या आवाहनालाही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . लातूर ग्रामीणच्या उमेदवार आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचाराची धुरा  माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी हाती घेऊन मतदार संघातील  भाजपा व इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कॉग्रेस पक्षात सन्मान पूर्वक प्रवेश देऊन नव्याने कॉग्रेस प्रवेश केलेले गंगासिह कदम, सुरेश लहाने, रमेश सोनवणे, दिलीप गोटके, गजेंद्र चव्हाण, अ‍ॅड  तात्याराव वाघमारे, मारुती गायकवाड, सचिन मोटेगावकर याच्यासह  कॉग्रेसमधील  जुन्या व नव्या पिढीतील व महाविकास  आघाडीतील  पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माजी मंत्री देशमुख यांनी प्रचाराची दिशा दिल्यामुळे  पदाधिकारी व कार्यकर्ते हे विजयाचे शिलेदार बनण्यासाठी  काम करीत आहेत. महाराष्ट्र कॉग्रेस अध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची महाविकास आघाडी व कॉग्रेस उमेदवार आ धिरज देशमुख यांच्या प्रचारार्थ रेणापूर येथे  सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत महाविकास आघाडी च्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध  करण्यात आला आहे तो जाहीरनामा नसून तो वचननामा असल्याचे सांगत भाजपा व महायुतीने केलेल्या फोडा फोडीच्या राजकारणाला विट आला आहे.
या निवडणूकीत मतदारांंना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. या सभेत भाजपाला सोडचिठ्ठी देत कॉग्रेस प्रवेश केलेले  माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी लातूर ग्रामीणमधील  भाजपा उमेदवाराचा  चांगलाच  समाचार घेत मला मिळालेल्या वागणुकीबदल धडा शिकाविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आ. धिरज देशमुख यांच्या प्रचारार्थ खा. सुप्रिया सुळे, खा. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत  महिला मेळावा घेण्यात आला. तसेच विकास कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व रिड लातूरच्या संचालिका  दिपशिखा देशमुख यांनी गेल्या महिन्यापासून मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.    यावेळी केंद्र, राज्यातील सरकारला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख व लातूर ग्रामीणमधून आ. धिरज देशमुख यांना विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR