20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeलातूरलातूर ग्रामीणमध्ये भाजपला धक्का, पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर ग्रामीणमध्ये भाजपला धक्का, पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपला रोज नवनवे धक्के बसताना दिसत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून लातूर ग्रामीण मतदारसंघातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लातूर ग्रामीणचे काँग्रेस- महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाचा विचार आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर ग्रामीणमधील भाजपच्या ओबीसी सेलचे लातूर तालुका उपाध्यक्ष रमाकांत बसपुरे, वंचितचे रेणापूर तालुकाध्यक्ष तथा सिंधगावचे माजी सरपंच गोंिवदराव पंडगे,  आंदलगाव (ता. रेणापूर) येथील सरपंच ज्ञानेश्वर सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बाभळगाव येथे आमदार धिरज देशमुख यांच्या उपस्थितीत आंदलगाव (ता. रेणापूर) येथील जयराम हिप्परकर, पांडुरंग हिप्परकर, अमोल कदम, दिपक सोनटक्के, काकासाहेब कदम, ईश्वर पवार, पवन हिप्परकर, आदित्य कदम, बाळासाहेब गाडेकर, नाथा कोलभुरे, मधुकर कोलभुरे, अंकुश कोलभुरे, चैतन्य हिप्परकर, दिपक कदम, प्रकाश शिंदे, उमेश शिंदे, बालाजी उगिले, नामदेव उगिले, हरिदास शिंदे आदींनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आमदार धिरज देशमुख यांनी स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी विजय देशमुख, गंगांिसह कदम, प्रमोद जाधव, सुभाष घोडके, अनुप शेळके  आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR