25.3 C
Latur
Friday, May 30, 2025
Homeलातूरलातूर जिल्हा परिषदचे मनपाला स्मरणपत्र

लातूर जिल्हा परिषदचे मनपाला स्मरणपत्र

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परीषदेच्या पश्चिम भागाच्या परीसरातुन उघडी नाली वाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून लातूर शहरात धडाकेबाज पाऊस झाल्याने या पावसाचे पाणी नाल्यामधून लातूर जिल्हा परिषदेत शिरले. या नालीच्या पाण्याबरोबर घाण जिल्हा परिषदेच्या परीसरात पसरत आहे. या वाहत असलेल्या उघड्या सांडपाणी नालीचे बंदीस्तीकरण व सफाई करावी, असे पत्र यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी दिले होते. मात्र त्या कामाच्या संदर्भाने काहीही कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा स्मरणपत्र लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून लातूर महानगर पालिकेला दिले आहे.
जिल्हा परिषद परिसराच्या पश्चिम बाजूकडील संरक्षक भिंतीलगतच्या शाम नगर या लातूर महापालिका क्षेत्रामधील सांडपाणी वाहून नेणारी महापालीकेची सांडपाण्याची नाली लातूर जिल्हा परिषदेच्या पश्चिम परिसरामधून संरक्षक भिंती मधून प्रवेश करून, जिल्हा परिषदेच्या पश्चिम व उत्तर बाजूकडील संरक्षक भिंतीच्या कडेने वाहात आहे. या परिसरात जिल्हा परिषदेचे यांत्रीकी उपविभाग, देखभाल दुरुस्ती कक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यालय, महिला बालकल्याण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग इ. कार्यालये असून ही सांडपाण्याची नाली त्यांना लागून वाहात आहे. सदर गटार ही पूर्णपणे उघडी असून पावसाळयामध्ये या वाहीनीचे पाणी सदर कार्यालयाच्या परिसरामध्ये शिरत आहे. तसेच ही नाली उघडी असल्याने डास व इतर जंतूप्रादूर्भाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या सर्व कार्यालयातील कर्मचा-याचे आरोग्यास धोक्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR