20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत शेतक-यांच्या ५ मुलांना ४८ लाख रुपये मंजूर

लातूर जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत शेतक-यांच्या ५ मुलांना ४८ लाख रुपये मंजूर

लातूर : प्रतिनिधी
राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत जिल्ह्यातील ५ शेतकरी सभासदांना उच्च शिक्षणासाठी ४८.३३ लाख रुपये गुरुवारी झालेल्या बँकेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे आजतागायत जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत ४६४ शेतक-यांच्या मुलांना २१.६६ कोटी रुपये कर्ज वाटप आलेली आहेत यात परदेशात शिक्षण घेणा-या ३४ शेतकरी मुलांना ५.२६ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आली आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध योजना राबवून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करीत असून वेगवेगळ्या योजना राबवून शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना  शेतक-यांची मुल उच्च शिक्षण घ्यावेत त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी जिल्हा बँक सतत पुढाकार घेत असते. उच्च शिक्षण अंतर्गत किंवा देशांतर्गत किंवा परदेशातील शिक्षणासाठी बँक कर्ज पुरवठा करत असुन त्यात वैधकीय पदवीधर, व पदव्युत्तर, इंजीनियरिंग पदवीधर, स्थापत्य विशारद पदवीधर, वा पदव्युत्तर, एम बी ए, औषधशास्त्र पदवीधर, शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज मंजुरी दिली जात असून यासाठी  शैक्षणिक कर्ज मर्यादेसाठी ८ लाख रुपये,देशांतर्गत वैद्यकीय पदवीधर यासाठी २० लाख रुपये, वैधकिय पदव्युत्तर शिक्षणासाठी ३० लाख , तर देशाबाहेरील कोर्सेससाठी २५ लाख रुपयांपर्यंत बँकेकडून शैक्षणीक कर्ज पुरवठा होत आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
७८१६ बचत गटांना ७९ कोटी ७६ लाख रुपयांचा कर्ज पुरवठा
जिल्ह्यातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जिल्हा बँक नेहमी वेळोवेळी बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम करत असून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ऑक्टोंबर २५ अखेर १६२८५ बचत गट आहेत बँकेच्या बचत खाती २६ कोटी २९ लाख रुपये असून ऑक्टोंबर २५ अखेर बँकेकडून ७७९७ बचत गटांना ७९ कोटी १४ लाख रुपये कर्ज वाटप केले आहेत तर नोव्हेंबर आजच्या दिवशी ६ नोव्हेंबर पर्यंत १९ बचत गटांना ६२ लाख कर्ज मंजूर केलेली आहेत अशी माहिती बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR