लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवर असंख्य पुरस्कार प्राप्त करणारी राज्यातील जिल्हा बँकात टॉप तीनमध्ये असलेली लातूर जिल्हा सहकारी बँक ही शेतक-यांच्या हितासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यातील शेतकरी सभासदांत आमदार संभाजी पाटल निलंगेकरांनी बेताल वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नये, असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रवक्ते नेते राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.
आमदार संभाजी पाटील यांच्या आरोपाला शेतकरी भीक घालणार नाही :
लातूर जिल्ह्याची निर्मिती होऊन अवघे चार दशक झाले आहेत. लातूर जिल्हा निर्मितीनंतर लातूरचे नंदनवन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांचे कार्य कोणालाही विसरता येणार नाही. जिल्ह्यात शिक्षण, सहकार उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक न्याय, कृषी आणि सहकार अशा विविध क्षेत्रात आपली वैचारिक दूरदृष्टी वापरून अचूक असे सूक्ष्म नियोजन करून झपाट्याने पुढें घेवुन विकास करण्यासाठी राज्याचे माजी, मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र सर्वश्रूत आहे. संपूर्ण जिल्ह्यात सामान्य माणसांना शेतक-यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहकार क्षेत्राचे जाळे निर्माण केले असून आज चौफेर प्रगती दिसून येत आहे.
लातूरची संस्कृती ही विविध विचारधारा जोपासणारी असतानाही विकासाच्या मुद्यावर लातूरचे नेतृत्व एकत्रित असल्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला लातूर जिल्ह्याला माहिती आहे. लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून संपूर्णपणे शेतक-यांच्या जीवनात कायापालट झाला असून आनंद, सुख, समृद्धी नांदत आहे. उद्योग क्षेत्रात भरीव मदत करताना शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून अनेक सहकारी कारखान्यांना आर्थिक मदत करताना शेतक-यांना पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा विक्रम याच बँकेच्या नावावर आहे. एकंदरीत बँकेचा कारभार हा अतिशय पारदर्शी असून हजारो शेतक-यांना याचा प्रत्यक्ष फायदा झाल्याची माहिती बँकेच्या लेखापरीक्षणातून आणि बँकेकडून ठेवलेल्या नोंदीवरून दिसून येतो. मात्र परवाच माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेच्या कारभारावर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करताना शेतक-यात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. परंतु, अशा आरोपाला इथला शेतकरी भीक घालणार नाही, असे मत शेतकरी नेते राजेंद्र मोरे प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केला
आहे.