24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडता येणार

लातूर जिल्हा बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडता येणार

लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने नुकताच राज्यातील २१ ते ६५ वयातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर  करुन दरमहा १५०० रूपये देण्याची घोषणा केली असून या योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक वाहिनी असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेसाठी जिल्ह्यातील  महिलांसाठी विशेष बाब म्हणून शून्य रकमेवर खाते उघडन्याची घोषणा केली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा महिला वर्गानी फायदा घ्यावा. नजीकच्या जिल्हा बँकेत कुठल्याही शाखेत खाते उघडावे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे .
लातूर जिल्हा बँक ही राज्यातील नावलौकिक असलेली बँक असून या बँकेच्या जिल्हाभरात ग्रामीण भागात १२२ शाखा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात व शहरातील महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत शून्य बॅलन्सने खाते उघडता येईल. यासाठी जिल्ह्यात आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR