31.8 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूरलातूर जिल्हा सहकारी बोर्ड राज्यात प्रथम क्रमांकावर

लातूर जिल्हा सहकारी बोर्ड राज्यात प्रथम क्रमांकावर

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांचे घटक कार्यालय लातूर जिल्हा सहकारी बोर्ड लातूर यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात  राज्याचे सहकार आयुक्त्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी या जिल्ह्याला दिलेले सहकारी शिक्षण प्रशिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे  लातूर जिल्हा सहकारी बोर्ड राज्यात प्रथम क्रमांकावर आले आहे. त्यानिमित्ताने सहकार बोर्डाकडून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये लातूर जिल्हा सहकारी बोर्डाने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी ६७१ प्रशिक्षणाचे कार्यक्रम पार पाडून सभासद ४१९४३ व ९७१ पदाधिकारी संचालक व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले राज्यात लातूर जिल्हा सहकारी बोर्डाने प्रथम क्रमांक पटकावला आहे  त्याबद्दल मंगळवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा सहकारी बोर्डाचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख   यांची संचालक मंडळाने भेट घेवून त्यांचा सत्कार केला
लातूर जिल्हा सहकारी बोर्डाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात बोर्डाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व गटसचिव यांच्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या कर्जवाटप व वसुली सोबतच विविध व्यवसाय कशाप्रकारे करतात त्यांचे व्यवस्थापन भाग भांडवल सभासदारासाठीच्या विविध योजना कशा प्रकारे राबवतात यासाठी कसबा बावडा ता कोल्हापूर येथील श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला भेट देण्यात आली.
जिल्ह्यातील औसा, देवनी, उदगीर लातूर या तालुक्यातील चेअरमन व गट सचिव यांनी अभ्यास दौ-यात सहभाग नोंदवला व या अभ्यास दौ-याचा लाभ काही सहकारी संस्थांनी त्यांच्या संस्थेमध्ये व्यवसाय सुरु करुन त्यांना झाला लातूर जिल्हा सहकारी बोर्ड  लातूर हे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात सहकारी शिक्षण प्रशिक्षणाचे काम सहकारी संस्थांसाठी करत असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या सहभागामुळे हे यश प्राप्त झाल्याची माहिती विजयकुमार पाटील अध्यक्ष लातूर जिल्हा सहकारी बोर्ड यांनी दिली  यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देशमुख, एस. बी. येळेकर, बी. बी. भोसले उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR