22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रलातूर जिल्ह्यातील हाडाचा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर!

लातूर जिल्ह्यातील हाडाचा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर!

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात सेवा देणारा हाडाचा अर्थात ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांचा मुलगा, ज्याने त्याच्या दुस-या प्रयत्नात नीटमध्ये कथितरित्या ६०२ गुण मिळवले आहेत, हे पिता व पुत्र सीबीआयच्या रडारवर असल्याचे समोर आले असून लातुरातील नीट पेपर लिक प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लातूर नीट प्रकरणातील गैरप्रकाराची सीबीआय ही तपास यंत्रणा चौकशी करीत असतानाच लातूर जिल्ह्यात एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका हाडाच्या डॉक्टरने काही दिवसापूर्वी आपल्या नीट परिक्षेत यश मिळवणा-या कर्तृत्ववान मुलाचे नीट स्कोअरकार्ड सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामध्ये सर्जनच्या मुलाच्या फोटोशिवाय सर्व तपशील जुळतात. त्यात त्यांच्या मुलाने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातल्याचे दिसून येते. त्याच्या काही सोशल मीडिया मित्रांनी नीटच्या वेबसाइटवरून उमेदवाराची मूळ गुणपत्रिका डाऊनलोड केली, तेव्हा त्यांना त्यावर दुस-याचा लाल रंगाचा टी शर्ट घातलेला फोटो दिसला. त्याचवेळी तरुणाच्या शैक्षणिक रेकॉर्डबद्दल जागरुक असलेल्या काही स्थानिक रहिवाशांनाही त्याच्या मूळ गावापासून १००० किमी अंतरावर असलेल्या दिल्लीत परीक्षेसाठी केंद्र निवडल्याबद्दल संशय निर्माण झाला.

दरम्यान जसजसा लातुरातील नीट पेपर लिक प्रकरणाचा तपास पुढे सरकत गेला, तसा ऑर्थोपेडिक सर्जनला त्रास जाणवू लागला आणि प्रथम त्याने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन करणारी शेकडो टिप्पण्या आकर्षित करणारी पोस्ट हटवली. तसेच त्याचे सोशल मीडिया खातेदेखील हटवले, अशी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान ही बाब लातुरातील एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून दि. २३ जून रोजी महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी डेप्युटी एस. पी. कुणाल अरोरा यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची एक टीम लातुरात तळ ठोकून आहे. या टीमकडे यासंबंधीचा तपास दिल्याची चर्चा आहे. त्या ऑर्थोपेडिक सर्जनच्या मुलाच्या वतीने नीट परीक्षेसाठी कोणी तरी उपस्थित असल्याच्या संशयाची चौकशी आता सीबीआय करीत आहे, असे समजते.

जाधव व पठाणच्या जामीन
अर्जावर आज सुनावणी
लातूर नीट पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेले व पोलिस, सीबीआय कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेले संशयित आरोपी संजय जाधव व जलील पठाण यांनी जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात दि. १८ जून रोजी अर्ज केला आहे तर सीबीआयने आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सीबीआय आपले म्हणणे सादर करते की पुन्हा वेळ वाढवून घेतला जातो का, की,फरार इरन्नाची चौकशी होईपर्यंत त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती केली जाते, ते पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR