22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ५ लाख कुटुंबांचे झाले सर्वेक्षण!

लातूर जिल्ह्यात ५ लाख कुटुंबांचे झाले सर्वेक्षण!

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे २९ जानेवारीपर्यंत ९६.६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या अंतर्गत ५ लाख ८८४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून उर्वरित सर्वेक्षणाची कार्यवाही आज पूर्ण केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. ८ हजार ४८६ प्रगणक आणि ५१३ पर्यवेक्षक या सर्वेक्षणाच्या कामामध्ये प्रत्यक्ष कार्यरत आहेत.
२९ जानेवारीपर्यंत लातूर शहरातील ७६ हजार ९०५ तर लातूर तालुक्यातील ग्रामीण भागात ७४ हजार १८२, अहमदपूर तालुक्यात ५५ हजार ११५, चाकूर तालुक्यात ३९ हजार २९५, उदगीर तालुक्यात ६० हजार २३३, जळकोट तालुक्यात १६ हजार ३१३, देवणी तालुक्यात १४ हजार ७२२, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १९ हजार ८८०, निलंगा तालुक्यात ५० हजार ३८५, औसा तालुक्यात ६८ हजार ४४५ आणि रेणापूर तालुक्यातील २५ हजार ४०९ कुटुंबांचे असे एकूण ५ लाख ८८४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे तसेच सुमारे १७ हजार ५५० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यातील अभिलेखांमध्ये आढळून आलेल्या कुणबी नोंदीनुसार दाखले वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या नोंदींची माहिती ग्रामपंचायत स्तरावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये या विषयी माहिती देण्यासाठी मदत कक्ष सुरू  करण्यात आले आहेत तरी
कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR