27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरलातूर जिह्यातील जल साठा सुरक्षित ठेवावा 

लातूर जिह्यातील जल साठा सुरक्षित ठेवावा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस चांगला पडला आहे, पावसाळा समाधानकारक झाला असून जवळपास मांजरा प्रकल्प आणि मांजरा नदीसह सर्वच धरणे आणि बंधा-यांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. पावसाळा संपत आल्याने येणारा रब्बी हंगाम चांगला पिकण्यासाठी, पिण्यासाठी पाणी आणि भविष्यातील गरजेसाठी जलसाठा सुरक्षीत रहाणे गरजेचे आहे. यासाठी पाणी गळती, अपव्यय होऊ नये म्हणून लाभक्षेत्र प्राधीकरण विभाग, लातूर आणि संबंधित विभागानी काळजी घ्यावी या पार्श्वभूमीवर,  निवेदन देण्याच्या सुचना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिल्या, त्या अनुषंगाने लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार सेलच्या वतीने लाभक्षेत्र विकास प्रधीकरण लातूर, विभागाचे अधीक्षक अभीयंता अमर पाटील यांना निवेदन दिले.
या सूचनेनुसार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार सेलने लाभक्षेत्र विकास प्रधीकरण लातूरच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन बंधा-यांमधील पाणी गळती थांबवण्याची मागणी केली आहे. सेलचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी सांगितले की, चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात पाणी समस्या नाहीशी झाली आहे. मात्र, हा जलसाठा वाया जाऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे धरणे, बंधारे भरलेले आहेत. हा जलसाठा रब्बी पीकासाठी आणि पुढील पावसाळयापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा आहे. आता पावसाळा संपत आला आहे, यामुळे पाण्याची गळती होणे, वाहून जाणे असे प्रकार होऊ नये याकरीता संबधीत विभागाने काळजी घ्यावी याकरीता निवेदन देण्याच्या सुचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिल्या.
यावेळी निवेदन देतांना लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार सेलचे अध्यक्ष, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, टवेन्टिवन शुगर लि.चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, सोशल मिडीया जिल्हाधयक्ष प्रविण सुर्यवंशी, लातूर तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद बोराडे, गोविंद डुरे पाटील, तालुका काँगेस उपाध्यक्ष अ‍ॅड. अच्युत चव्हाण, ओबिसी विभाग अध्­यक्ष  ज्ञानोबा गवळी, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अरुण पाटील, सचिव तालुका काँग्रेस रामानंद जाधव, सचिव तालुका काँग्रेस सिध्देश्वर स्वामी,  विनोद पाटील, आनंत बारबोले आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR