लातूर : प्रतिनिधी
यशवंत पंचायत राज अभियानासाठी तयारी केलेल्या लातूर जिल्हयातील लातूर पंचायत समिती, औसा पंचायत समिती व लातूर जिल्हा परिषदेच्या स्व: मुल्यांकणाची छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या जिल्हा परिषद धाराशिवच्या पथकामार्फत बुधवार दि. ५ मार्च रोजी तपासणी करण्यात आली.
यशवंत पंचायत राज अभियान २०२४-२५ अंतर्गत लातूर जिल्हयातील १० पंचायत समित्यांसह लातूर जिल्हा परिषदेनेही २०० गुणांपैकी स्व: मुल्यांकण केले होते. तसा अहवाल विभागीय आयुक्तांना लातूर जि. प. ने महिनाळभरापूर्वी पाठवला होता. विभागात सर्वाधिक गुण असलेल्या लातूर जिल्हा परिषदेची, तसेच लातूर व औसा पंचायत समित्यांच्या स्वगुणांची तपासणी करण्यासाठी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या पथकामार्फत बुधवारी ठरवून दिलेल्या मुल्यांकणानुसार अभिलेख तपासणी झाली. छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या जिल्हा परिषद धाराशिवच्या पथकात अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उपमुख्यकार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांचा समावेश होता.
लातूर जिल्हा परिषदेच्या अभिलेख्यांची सकाळी तर दुपारी लातूर व औसा पंचायत समितीच्या अभिलेख्यांची तपासणी प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखूर्डे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कक्ष अधिकारी व्ही. जी. बादणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पंडित जगताप, तसेच लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
………………………१५…………………………