लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हा परिषदेने खेलो लातूर अंतर्गत मुलांच्या शालेय अभ्याक्रमाबरोबर शारिरिक विकास व्हावा म्हणून लातूर जिल्हयात प्रथमच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून जिल्हा परिषद शाळामध्ये सुसज्ज असे क्रिडांगण तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. या उपक्रमाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ चा सर्वेतृष्ठ कल्पना, उपक्रमाचा लातूर जिल्हा परिषदेला तृतीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान (पायका) योजनेतंगर्त फूटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो खेळासाठी नियोजन पूर्वक क्रीडांगण तयार करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी खेलो लातूर अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना क्रीडांगण तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला.
मुलांच्या शालेय अभ्याक्रमाबरोबर शारिरिक विकास व्हावा म्हणून लातूर जिल्हयात प्रथमच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरील १० हजार स्केअर फूट जागेत क्रीडांगण विकसीत करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. पहिल्या टप्यात ११८ मान्यता देण्यात आली असून ४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर ९२ कामे प्रगतीपथावर आहेत. या नाविण्यपूर्ण कल्पक उपक्रमाचे मुल्यमापन ऑनलाईन करण्यात आले. त्यानुसार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ अंतर्गत राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून, राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार लातूर जिल्हा परिषदेला खेलो लातूर माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना रोहयोच्या माध्यमातून क्रीडांगण तयार करण्यात आले. या कल्पक उपक्रमाला राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.