34.4 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रलातूर पॅटर्नची महाराष्ट्राला गरज : विवेक सौताडेकर

लातूर पॅटर्नची महाराष्ट्राला गरज : विवेक सौताडेकर

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्यान

पुणे : प्रतिनिधी
गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून ‘लातूर पॅटर्न’ देशभरात दुमदुमतो आहे. येथील शेकडो मुले नीट , जेईई परिक्षेत उत्तीर्ण होतात. या यशाचे गमक विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक आणि पालक या चतु:सूत्रीमध्ये आहे. यातील सर्वच घटक ध्येय समोर ठेवून काम करतात म्हणून यशस्वी होतात. त्यामुळे लातूर पॅटर्नची महाराष्ट्राला गरज आहे असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक विवेक सौताडेकर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात बोलताना केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विवेक सौताडेकर यांचे ‘बारावीच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी मंचावर फर्ग्युसन महाविद्यालय कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.डी. डी. कुंभार व प्रमुख पाहुणे म्हणून पुणे बार्टी मान्यता प्राप्त सेंटरचे प्रमुख प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते.
श्री. सौताडेकर पुढे म्हणाले की,डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा इ.स.१८८५ साली विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी स्थापन केली असून पुण्यातील ही पहिली शिक्षणसंस्था आहे. येथे वि.दा. सावरकर, माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव,व्ही.पी.सिंग,पु.ल.देशपांडे,प्र.के.अत्रे, डॉ.श्रीराम लागू, डॉ.जनार्दन वाघमारे यांसारखे हजारो विद्यार्थी घडले.

या कार्यक्रमासाठी मंचावर फर्ग्युसन महाविद्यालय कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.डी. डी. कुंभार व प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील बार्टी मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.डॉ.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.डी.डी. कुंभार यांनी केले. प्रशांत ठाकूर यांनी बार्टी अंतर्गत योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.व्याख्यात्यांचा परिचय मराठी विभागाचे प्रा.डॉ.जगदीश पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . डॉ. मुरलीधर बेतल्लू यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR