24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeलातूरलातूर पोलिसांकडून पिस्टलसह तरुणास अटक

लातूर पोलिसांकडून पिस्टलसह तरुणास अटक

लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने लातूर-तुळजापूर रोडवर बेलकुंड पाणी टाकीजवळ एका तरुणास एक पिस्टल दोन जिवंत काडतूसे, मॅगझीनसह अटक केली आहे. महेश दिनकर कुलकर्णी रा. टाका ता. औसा असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे कडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस व मॅकझीन असा एकूण ८१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे भादा येथे गु.र.नं. १२८/२०२४ कलम ३ (१) २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास भादा पोलिस स्टेशनचे पोलीस हे करीत आहेत.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून १ पिस्टल, २ राउंड व मॅकझीन बाळगणा-या इसमाला ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पट्टेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले, पोलीस अंमलदार रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे. पुणे येथे वास्तव्यास असलेला आरोपी महेश दिनकर कुलकर्णी हा पो.स्टे. सिंहगड रोड पुणे मधील आरोपी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR