39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरलातूर बस स्थानक ‘ब’ गटात स्वच्छतेत द्वितीय  

लातूर बस स्थानक ‘ब’ गटात स्वच्छतेत द्वितीय  

लातूर : प्रतिनिधी
हिंदु-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये ‘ब’ गटात लातूर बसस्थानक स्वच्छतेत द्वितीय आला असून २.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले असल्याची माहिती विभाग प्रमुख अश्वजित जानराव यांनी सागीतले.
१ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळामध्ये महामंडळांच्या सर्वा बसस्थानकांवर हिंदु-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारीत राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून  बसस्थानक व परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपन, प्रवाशांना बसस्थानकावर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईट ही कामे करण्यात आली. या योजनेअंतर्गत तीन प्रवर्ग करण्यात आले होते.
यात ‘ब’ वर्गात लातूर बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावला असून २.५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले असून येत्या स्वातंत्र्य दिनी दि. १५ ऑगस्ट रोजी सदर पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.  या अभियानात मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड केली.
ही स्पर्धा राज्यातील ५६३ बसस्कानकांवर घेण्यात आली. या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरुन अ, ब, क आणि ड वर्गात वर्गीकरण करण्यात आले होते. हिंदु-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानातील ‘ब’ गटात लातूर बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावत २.५ लाखांचे बक्षीस मिळवले आहे. हे बक्षीस पटकावण्यासाठी लातूर विभागीय अधिकारी अश्वजीत जानराव, संदीप पडवळ, बलभीम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बिडवे, विजयकुमार बनसोडे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR