लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिम ही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्व्ये सुरु करण्यात आली आहे. शनिवार दि. २२ जून रोजी गाळे धारकांवर धडक कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये ६ गाळे सील करत ३ लाख ५६ हजार २०१ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. सदर वसुली हि व्यापारी संकुलामध्ये करण्यात आलेली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधी मैदान सा.क्रं. १११ व ११२ व्यापारी संकुल येथील ५ गाळे सील केले व १ लाख ९२ हजार २४३ रूपये नगदी वसुली करण्यायत आली आहे. तसेच सारोळा रोड व्यापारी संकुल येथील १ गाळा सील करण्यात आला आहे. गांधी मार्केट येथील १ लाख ६३ हजार ९५८ रूपयांचे चेक प्राप्त झाले.
त्याअनुषंगाने लातूर शहरातील मनपा मालकीच्या गाळे धारकांना उपायुक्त, डॉ. पंजाब खानसोळे यांच्याव्दारे आवाहन करण्यात येते की ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे. अशा गाळे धारकांनी तात्काळ थकबाकीचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे. व गाळे धारकांनी थकबाकी भरणा न केल्यास अशा गाळे धारकांवर अशीच कार्यवाही सुरु रहाणार आहे.