गंभीर जखमी, सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार
लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ च्या सुमारास राहत्या घरी स्वत:च्या पिस्टलातून अंगावर गोळ््या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, ते जागेवरच कोसळले. घटनेचे वृत्त समजताच तातडीने त्यांना सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अंगावर गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे एक कडक शिस्तीचे आयुक्त म्हणून ओळखले जातात. महापालिकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचे काम त्यांनी केले. मात्र, आज रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वत:च्या पिस्तुलातून स्वत:वर गोळ््या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती लातूर शहरात वा-यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. स्वत:वर गोळी झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ सह्याद्री हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच पोलिस अधिका-यांनी मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी धाव घेतली. गोळ््या झाडून घेण्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.