21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरलातूर मल्टिस्टेटतर्फे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार

लातूर मल्टिस्टेटतर्फे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार

लातूर : प्रतिनिधी
लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूरच्या वतीने लातूरचे नव निर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा  सत्कार करण्यात आला.  लातूर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लातूरचे संस्थापक चेअरमन जे. जी. सगरे होते. यावेळी संस्थेचे संस्थापक वाईस चेअरमन प्रभाकर बंडगर, ज्येष्ठ संचालक ऋषिकेश बद्दे, संचालक प्रभाकर कापसे, व्हॉईस चेअरमन केजकर, शिक्षण संस्थाचालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी खासदार डॉ. काळगे यांच्या सत्कार जे. जी. सगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना डॉ. काळगे म्हणाले, येथून पुढे सहकार क्षेत्रासाठी काहीही मदत लागली व केंद्रामध्ये कुठलीही अडचण असेल त्यावेळेस सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, तसेच आजकाल सहकार क्षेत्रामध्ये जे चढ उतार येत आहेत त्या काळातही लातूर मल्टीस्टेट ही संस्था भक्कमपणे उभी असून आपले नाव उंचावत आहे याबद्दल त्यांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन जे जी सगरे, चेअरमन इसरार सगरे सर,  सर्व संचालक मंडळ तसेच  कर्मचारी यांचे कौतुक केले. यावेळी जे. जी. सगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन इसरार सगरे यांनी करताना गेल्या १२ वर्षांतील संस्थेचा आढावा तसेच संस्था सहकार क्षेत्रामध्ये करत असलेल्या प्रगतीचा लेखाजोखा व संस्थेतर्फे ग्राहक तसेच कर्मचारी यांच्यासाठी देण्यात येणा-या सेवा, सुविधांचा आढावा सर्वांसमोर मांडला कार्यक्रमास साईबाबा जनता सहकारी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच लातूर मल्टिस्टेटचे डेप्युटी सीईओ दाताळ, असिस्टंट जनरल मॅनेजर शाहीद शेख, जनरल मॅनेजर भगवान सांगवे, असिस्टंट जनरल मॅनेजर फैय्याज देशमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR