लातूर : प्रतिनिधी
लातूर व्यापारी धर्मशाळाद्वारा मिरागि नेत्रालयाला २५ तिरळेपणा, मोतीबिंदू व डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहकार्य करणार असल्याची माहिती नॅब लातूरचे अध्यक्ष डॉ. विजय राठी यांनी दिली आहे. लातूर व्यापारी धर्मशाळाद्वारा सामाजिक बांधिलकी म्हणून काही कार्यक्षेत्रातील सेवाभावी संस्थांना आर्थिक सहकार्य करण्याच्या भावनेतून नँब संचलित मिरागी नेत्रालयासाठी आर्थिक सहकार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लातूर व्यापारी धर्मशाळा या संस्थेने संस्थेस २५ ऑपरेशन करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे मिरागी नेत्रालयाने मान्य केले आहे.
याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व दारिद्य रेषेखालील सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. ही योजना फक्त ऑपरेशनसाठी असेल. बाकी खर्च पेशंटला करावा लागेल. या योजनेसाठी १ एप्रिल २०२५ पासून नोंदणी करुन तपासून घ्यावे. मीरागी नेत्रालय हे गीतांजली मार्केट, लातूर येथे आहे. तपासणीसाठी वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत आहे. सर्व पेशंटनी सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. या सहकार्यासाठी अरविंद सोनवणे, लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी, दिनेश इनानी, हेमंत बोरा, ललित शहा, रमेश बियाणी आणि ईश्वरप्रसाद डागा आदींचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे त्याबद्दल डॉ. राठी यांनी समाधान व्यक्त केले.