लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याला वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. या इतिहासाची साक्ष देणारी अनेक वारसा स्थळे जिल्ह्यात आहेत. या वारसा स्थळांची आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी, यासाठी इतिहासप्रेमी नागरिक, इतिहास अभ्यासक आणि लातूर जिल्हा प्रशासनाने ‘लातूर हेरिटेज वॉक’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी फीत कापून व तिरंगी बलून हवेत सोडून हनुमान चौक येथे या उपक्रमाची सुरुवात केली.
संगीता टकले, अहिल्या गाठाळ, रोहिणी न-हे-विरोळे, पंजाबराव खानसोळे, नागेश मापारी, वंदना फुटाणे, तृप्ती अंधारे, सोमनाथ रेड्डी, रामदास कोकरे यांच्यासह जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पहिल्या पर्वाच्या उद्घाटनासाठी गंजगोलाई परिसरात सजावट करण्यात आली होती.