34.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमुख्य बातम्यालालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

 

पाटणा : वृत्तसंस्था
राष्­ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४.०५ वाजता एअर इंडियाच्या विमानाने ते दिल्­ली जाणार होते. यापूर्वी त्­यांची प्रकृती बिघडल्­याने त्­यांना पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्­यान, आज रात्री उशिरा त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीतील एम्स येथे नेले जाण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासून लालू यादव यांची प्रकृती बिघडली. त्­यांना तत्­काळ पाटणा येथील पारस रुग्णालयात दाखल करण्­यात आले. लालू यादव यांच्यासोबत त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबातील इतर सदस्य आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. लालू यादव यांची अलीकडेच तब्येत सुधारली होती. पण, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. दरम्­यान, आज रात्री उशिरा त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीतील एम्स येथे नेले जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR