24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरलावलेल्या रोपांच्या संगोपनाचा नियमीतपणे आढावा घेणार

लावलेल्या रोपांच्या संगोपनाचा नियमीतपणे आढावा घेणार

लातूर : प्रतिनिधी
माझं लातूर, हरित लातूरच्या माध्यमातून वृक्षलागवड होणार आहे. वृक्षलागवड बाबत लातूर जिल्हा परिषद गंभीर असुन लावलेल्या सर्व रोपांचा, त्यांच्या संगोपनाचा आढावा नियमीतपणे घेतला जाणार आहे. म्हणून सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी वृक्षलागवड हा स्वत:चा विषय समजून काम करण्याचे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.
माझ लातूर हरित लातूर (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद, लातूर वृक्ष लागवड विशेष अभियान २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष लागवड पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस कृषि महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, वृक्ष मित्र सुपर्ण जगताप, संदिप पाठक, तसेच सिनेअभिनेते सयाजी शिंदे (ऑनलाईन) व सर्व विभागांचे विभाग प्रमुख व अधिनिस्त कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद, लातूर यांना ३३ लाख ९५ हजार ४०० वृक्षांचे उद्दिष्ट असुन सदर उद्दिष्ट पुर्ण करण्याचे आवाहान केले. त्यामध्ये वृक्षलागवड ही केवळ उद्दिष्टाआधारित न करता प्रत्यक्ष वृक्ष संगोपन करावे. दरवर्षी लातूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड होते, पण सर्वच रोपे जीवंत राहत नसल्याने वनक्षेत्राचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या-ज्या रिकाम्या जागा व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करून संगोपन करण्याची मोठी संधी आहे. बिहार पॅटर्न अंतर्गत मनरेगामधून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान ४०० झाडे लावून ती जगवणे बंधनकारक आहे. सोबतच घनवनलागवड व ईतर वृक्षलागवड करावी. यामध्ये वेळोवेळी लोकसहभाग मोठया प्रमाणावर घ्यावा व ही जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यशाळेत लातूर जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या गटांतर्गत करावयाचे वृक्ष लागवडीचे नियोजन व आराखडा यांचे सादरीकरण केले. तसेच सयाजी शिंदे हे चित्रीकरणादरम्यान व्यस्त असतानाही त्यांनी लातूरचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले व लवकरच लातूरला भेट देऊन वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भगवान गिरी यांनी केले. आभार कृषि विकास अधिकारी सुभाष चोले व नरेगाचे सहा. गट विकास अधिकारी संतोष माने यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR