लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंती निमित्त मनोधैर्य सेवाभावी संस्था, लातूर संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा बुध्दीबळ संघटना व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) यांच्यावतीने लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप (एक दिवसीय (खुल्या) जलदगती राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन दि. २ जून रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय,चंद्रनगर बसस्टन्ड जवळ, लातूर येथे सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर होणार आहे. लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप -२०२४ या (एक दिवसीय खुल्या जलदगती राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा) संस्थेचे अध्यक्ष गायकवाड पवनकुमार, उपाध्यक्ष शेख सिराज यांच्या पुढाकारातून होत असून ही स्पर्धा पार पाडण्यासाठी माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, शेख असलम, शेख इरफान, शेख फारुख, शेख महमद, डी. उमाकांत, शेख खाजा पाशा, सचिन वाघमारे, संजय सुरवसे, आकाश मगर, इलीयाज शेख परिश्रम घेत आहेत. प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार तर तृतीय ५ हजाराचे पारितोषिक असून एकूण आकर्षक 30 पारितोषिक व २० चषक आहेत.
एकूण बक्षीसाची रक्कम हजारोंच्यावर असून या स्पर्धा गायकवाड पवनकुमार यांच्या संकल्पनेनुसार लातूर जिल्हयातील व राज्यातील उत्कृष्ट बुध्दीबळ पटू सहभागी होणार आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्थानिक स्पर्धांकांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करुन सहभाग नोंदवावा असे आवाहन मनोधैर्य सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनर चेस अॅकडमी, क्रिडा संकुल लातूर येथे व श्रीराम साने, अमितकुमार बियाणी, श्रीकांत मंत्री, उदय वगारे, अनिरुध्द बिराजदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.