30.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeलातूरलोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पीयनशीप ग्रामीण-टी-१० स्पर्धा

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पीयनशीप ग्रामीण-टी-१० स्पर्धा

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण-टी १०’ भव्य स्पर्धा रेणापूर येथील आश्रम शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी तालुक्यातील क्रिकेट संघांना ८ मे २०२५ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १० ‘ भव्य स्पर्धा तालुका स्तरावरावर यशस्वी करण्यासाठी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.४ रोजी रेणुका देवी मंदीर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस रेणापूर शहर कॉग्रेसचे अध्यक्ष पद्मसिह पाटील, रेणा कारखान्याचे संचालक गोविंद पाटील, बालाजी हाके पाटील, पंडीतराव माने, उपसभापती अ‍ॅड. शेषेराव हाके, कृउबाचे संचालक जनार्धन माने, कमलाकर अकनगिरे, विश्वनाथ कागले, सचिन मोटेगावकर ,हनमंत पवार, केदार हालकुडे, पाशामियाँ शेख, सुरज वंगाटे, मनोहर व्यवहारे, बाळासाहेब करमुडे , भूषण पनुरे, रामलिंग जोगदंड, अनिल पवार, गुलाब चव्हाण, चेतन एकुरके, रहिम पठान , तानाजी सुर्यवंशी ,प्रदिप काळे,सचिन इगे , विलासराव राठोड, दयानंद राठोड, उदय राठोड, सुरेश चव्हाण , रोहित गिरी ,यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रथम ५१, द्वितीय ३१ हजारांचे पारितोषीक
तालुकास्तरावर होणा-या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपयांचे तर द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपयांचे दिले जाणार आहे. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या संघांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. तेव्हा तालुक्यातील प्रत्येक गावातील क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी येथे संपर्क साधावा
रेणापूर तालुक्यातील क्रिक्रेट संघानी नोंदणीसाठी- रेणापूर- अ‍ॅड. प्रमोद जाधव ९८५०५०३६४५, कमलाकर अकनगिरे-७६२०००३१११, पद्ममसिंह पाटील ९४२१३२४१५८, प्रदिप राठोड, ९४२३३४८११६, अभिजीत चव्हाण, ८८५६०७२५८३, कामखेडा सर्कल विश्वजीत पाटील ९६०७७५५५५१६, खरोळा सर्कल विश्वनाथ कागले ९९२३२६१२७१, पोहरेगाव बिभीषण कदम ९८५०४३४४७१, पानगाव- गजानन फ्लावर स्टॉल गजानन फुलारी ९६५७६३६९४१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR