19 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरलोकशाहीचा उत्सवासाठी सर्वानी मतदान करावे

लोकशाहीचा उत्सवासाठी सर्वानी मतदान करावे

अहमदपूर :  प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदपूर  तालुक्यातील गुंजोटी येथे दि. २५ रोजी सकाळी प्रबोधपर लोकगीतातून मतदार जनजागृती करण्यात आली. आपल्या गावातून १०० टक्के मतदान करण्यासाठी स्वीप पथकाने मतदारांना आवाहन केले.   मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देवून लोकशाहीतील महा उत्सवात सहभाग नोंदवावा. आपण शासनाच्या सर्व सोई सुविधा हक्काने उपभोगत आहोत. संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क येणा-या २० नोव्हेंबर रोजी आपले  कर्तव्य समजून पार पाडावे. देशाचे आदर्श भारतीय नागरीक होण्याचे कर्तव्य पार पाडून देशातील आदर्श नागरीक होण्यासाठी महाउत्सवात सहभाग नोंदवावा.
   या उपक्रमासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरंिसंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,दिलीप हैबतपुरे यांच्या आदेशानुसार मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीपचे सदस्य  महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे, मोहन तेलंगे, बस्वेश्वर थोटे, नागनाथ स्वामी, अर्चना माने, विवेकानंद भंडे, संभाजी यलपुरवाड यांच्यासह गुंजोटी येथील ग्रामसेवक हरिराम भंटवाड, राम चव्हाण, बाबूराव आलापूरे, बालाजी मुंगे, धमानंद वाघमारे, गोंिवद नराळे, गुप्तंिलंग अपंिसंगे, बालाजी सपकाळ, धोडिराम सपकाळ, दस्तगिर सय्यद,  लक्ष्मण खलसे, मन्मथ कदम, गावातील मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR