परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील बी.ए. द्वितीय वर्षात शिकणारा धिरजकुमार प्रधान याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात लोकसंगीत कलाप्रकारात सर्वतृतीय पारितोषिक मिळविले आहे.
मार्च महिन्यांत जालंधर (पंजाब) येथे होणा-या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. धीरजने सदरील स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नेतृत्व केले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे, संगीत विभागप्रमुख प्रा. सविता कोकाटे, प्रा.अमोल गवई, प्रा.अंकुश खटिंग, प्रा.रवी सोनवणे, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचा-यांकडून त्याचे अभिनंदन केले.