27.3 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठीही इंडिया आघाडी मैदानात उतरणार

लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठीही इंडिया आघाडी मैदानात उतरणार

नवी दिल्ली : लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी फैजाबादमधून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे अवधेश प्रशाद इंडिया आघाडीचे उमेदवार असतील, हे विरोधी पक्षांनी जवळपास निश्चित केले आहे.

प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस, इंडिया आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील चर्चेत अवधेश प्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विरोधी पक्ष उपाध्यक्षपदाच्या मागणीवर ठाम आहे. पण एनडीए सरकारला निवडणुकीशिवाय उपाध्यक्षपद विरोधकांना द्यायचे नाही. त्यामुळे विरोधकांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता.

संसदेच्या अध्यक्षपदाइतकेच उपाध्यक्षपदही महत्त्वाचे आहे. घटनेच्या कलम ९५ मध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा ते पद रिक्त होते किंवा अध्यक्ष अनुपस्थित असतात, तेव्हा उपाध्यक्ष हे अध्यक्षांची जबाबदारी पार पाडतात. जर उपाध्यक्षपद रिक्त असेल आणि अध्यक्ष उपस्थित नसतील तर अशा परिस्थितीत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले लोकसभा खासदार सभागृहाचे कामकाज हाताळतात. राज्यघटनेने जे अधिकार उपाध्यक्षांना दिले आहेत, तेच अधिकार उपसभापतींनाही दिले आहेत.

फैजाबाद मतदारसंघातून खासदार होण्यापूर्वी अवधेश प्रशाद हे अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर विधानसभेचे आमदार होते. ते दीर्घकाळपासून समाजवादी पक्षाशी संबंधित आहेत आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी जनता पक्षातून राजकारण सुरू केले. १९७७ मध्ये अयोध्या जिल्ह्यातील सोहावल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR