22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeपरभणीलोकसभेच्या निकालावर ठरविणार गंगाखेड विधानसभेचे चित्र

लोकसभेच्या निकालावर ठरविणार गंगाखेड विधानसभेचे चित्र

पालम : राहुल गायकवाड
नुकत्याच संपन्नन झालेल्या लोकसभा निवडणुकीचा येत्या ४ जुन रोजी निकाल जाहीर होणार असुन या निकालावरच गंगाखेड विधानसभेचे चित्र ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान या विधानसभेचे विद्यमान आ. आ. रत्नाकर गुट्टे यांचीही या मतदार संघावर किती पकड राहणार असे समोर येणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणावर निवडणूक संपन्न झाली. यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे या निवडणुीत उतरल्याने आ. रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी गंगाखेड मतदार संघात ज्या प्रकारे निवडणुकीची समीकरणे आ. गुट्टे यांनी हातात घ्यायला पाहिजे होते त्या पद्धतीने न घेता विधानसभेतील अनेक गावात न फिरता तसेच प्रभावी प्रचार यंत्रणा न राबविल्याने या निवडणुकीत जानकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून जानकर हे निवडणुकीत उतरले असतांना आ. गुट्टे यांच्याकडून म्हणावा तशी प्रचार यंत्रना राबविण्यात आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गंगाखेड मतदार संघात आ. गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांचाही वाढत चाललेली नाराजी फटका जानकर यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भविष्यात जातीय समीकरण लक्षात घेता पुन्हा या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगतदार राहणार आहे. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचे जानकर हे बाजी मारणार का हे येत्या ४ तारखेला समोर येणारच असुन या निकालानंतरच गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे चित्र समोर येणार हे मात्र निश्चित.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR