22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रलोणावळ्यात दारूच्या गोडाऊनला भीषण आग

लोणावळ्यात दारूच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : लोणावळा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीलकमल थिएटरसमोर असलेल्या एका दारूचा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच धावपळ उडाली होती. या गोडाऊनच्या शेजारी एक हॉस्पिटल देखील आहे. मात्र, अग्निशामक दलाने प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टाळली आहे. या आगीत लाखोंची दारू जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणावळा येथील मुख्य बाजारपेठेत दारूचा साठा असलेले गोडाऊन आहे.

या गोडाऊनला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोंची दारू जळून खाक झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लोणावळ्यातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एका बिल्डिंगच्या तळमजल्यावर हे गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या शेजारील एक भिंत सोडून हॉस्पिटल आहे. मात्र, प्रसंगावधान राखत अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टळली.

आगीचे कारण अद्याप समोर आले नसून, शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांची दारू जळून खाक झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR