30.5 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरलोदगा सरपंचाचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

लोदगा सरपंचाचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाची अपुर्ण कामे पुर्ण करावीत, या व इतर मागण्यांसाठी औसा तालुक्यातील लोदगा येथील सरपंच पांडूरंग गोमारे यांनी दि. ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. महामार्गावर जागोजागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गाची अपुर्ण कामे पूर्ण करावीत, ठेकेदार व अभियंत्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, आदी मागण्यांसाठी लोदगाचे सरपंच पांडूरंग गोमारे यांनी यापूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी अधिका-यांनी या महामार्गाची दुरुस्ती करण्याची आश्वासन दिले होते. परंतू, ते आश्वासन अद्यापही पूर्ण झाले नाही.  त्यामुळे संतप्त झालेले सरपंच पांडूरंग गोमारे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच एमआयडीसी पोलिसांनी सरपंच गोमारे यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR