20.2 C
Latur
Saturday, November 30, 2024
Homeमहाराष्ट्रवंचित ते मनसे, मतांमध्ये कमालीची घट

वंचित ते मनसे, मतांमध्ये कमालीची घट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा प्रमुख पक्षांचा बोलबाला असल्याचे सिद्ध झाले. मतविभाजनाची भूमिका बजावणा-या पक्षांपेक्षा प्रमुख पक्षांनाच मतदान करण्याकडे कल वाढल्याचे दिसून आले आहे.

वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एआयएमआयएम या पक्षांच्या मतांमध्ये कमालीची घट बघायला मिळाली आहे. त्याचबरोबर या पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या लहान राजकीय पक्षांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या निवडणुका विचारात घेतल्यास वंचित, बसप आणि मनसे या पक्षांना मिळणा-या मतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बघायला मिळाले आहे.

आकडेवारीनुसार २०१९ वंचितने २३६ जागा लढवल्या होत्या. यामध्ये पक्षाच्या मतांचा वाटा ४.६५ टक्के होता व एकही जागा जिंकता आली नाही; तर बसपनेही २६३ उमेदवार रिंगणात उतरवले होते, व त्यांचा मतांचा वाटा १.०३ टक्के इतका होता.

मनसेनेही १०१ उमेदवार दिल्यानंतर त्यांना एका जागेसह २.२६ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये पक्षांच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. २०२४ निवडणुकीत वंचितच्या मतांचा वाटा २.६५ टक्के इतका खाली आला. यात वंचितने २०० जागा लढवल्या होत्या; तर बसपला २३७ जागांवर लढूनही ०.४८ टक्केचे मतांचा वाटा होता. तर १२५ जागा लढवणा-या मनसेचे मतांचा वाटा १.५५ टक्क्यांपर्यंत घसरला.
‘एमआयएम’च्या मतांचा वाटा घसरून ०.८६ टक्क्यांपर्यंत आला. दरम्यान, पक्षाचा एक उमेदवार निवडून आला. या पक्षांच्या विभागीय पातळीवर मतांचा वाटा बघितल्यास मराठवाडा व विदर्भात २०१९मध्ये अनुक्रमे ८.०६ आणि ७.७८ टक्के मतांचा वाटा २०२४ मध्ये ४.७९ आणि ३.७८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR