अमरावती : प्रतिनिधी
लव्ह जिहाद कायदा येईल तेव्हा अनेक मुली वाचतील, अशी भावना व्यक्त करत माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’विरोधात कायद्याच्या प्रस्तावावर भाष्य केले आहे.
दरम्यान, राज्यात लव्ह जिहाद खूप वाढलेला आहे.
या कायद्यामुळे येणा-या पिढीला खूप फायदा होईल. अनेक समिती यावर काम करत होत्या, यातील अनेक मुलींना आम्ही वापस आणले आहे. मागील ५ वर्षांत महाविकास आघाडीच्या वेळी मोठ्या प्रमाणात यात आरोपींना सहकार्य मिळत होते, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी वक्फ बोर्डाविषयी केले.
यात त्या म्हणाल्या की, वक्फ बोर्ड बंद करून सनातनी बोर्ड स्थापन करावा, अशी मागणी मी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.