35.3 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमुख्य बातम्यावक्फ विधेयक मसुद्याला मुस्लिम महिलांचे समर्थन

वक्फ विधेयक मसुद्याला मुस्लिम महिलांचे समर्थन

नवी दिल्ली/भोपाळ : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून वक्फ विधेयकाची देशभर चर्चा सुरू आहे. हे विधेयक आज लोकसभेत मोदी सरकारने सादर केले. काही जण या विधेयकाच्या बाजूने आहेत तर काही विरोधात आहेत. सरकारला सभागृहात जेडीयू, टीडीपी आणि जेडीएस या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. विरोधी पक्षही या विधेयकाविरुद्ध एकवटला आहे. काँग्रेसने हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचे म्हटले. समाजवादी पक्षाने या विधेयकाला विरोध केला जाईल असं सांगितले आहे.

दरम्यान, भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ मुस्लिम महिलांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. भोपाळमध्ये मुस्लिम महिला वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ च्या समर्थनार्थ बाहेर पडल्या. भोपाळमध्ये मोठ्या संख्येने निदर्शने करणा-या मुस्लिम महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणारे फलक हातात घेतले होते. यामध्ये पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. महिलांनी ‘मोदीजी, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, अशा घोषणा दिल्या.

दिल्लीतही वक्फ कायद्याच्या समर्थनात मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांनी हातात फलक पकडले आहेत, त्यावर ‘मोदीजी, वक्फ मालमत्तेचे उत्पन्न तिच्या योग्य मालकापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि वक्फ बोर्डात महिला आणि मागासलेल्या मुस्लिमांना वाटा दिल्याबद्दल धन्यवाद’, असं लिहिले आहे.

दुसरीकडे या विधेयकावरुन आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी टीका केली आहे. संजय सिंह म्हणाले, देशातील जनतेला आता हे लक्षात आले पाहिजे की भाजपने वक्फ मालमत्तांवर कब्जा करून त्या आपल्या मित्रांना देण्यास सुरुवात केली आहे. ते गुरुद्वारा, मंदिरे आणि चर्चच्या मालमत्तांबाबतही असेच करतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही विधेयकावर विचार करू. याबद्दल चर्चा सुरू आहे. आम्ही ‘इंडिया’ सोबत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR