22.1 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रवनगा घरी परतले; निघून गेले

वनगा घरी परतले; निघून गेले

पालघर : प्रतिनिधी
शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. नाराज झाल्यामुळे आणि तणावात ते गेल्या ३६ तासांपासून नॉट रिचेबल होते त्यानंतर अखेर ते ३६ तासांनंतर घरी आले, कुटुंबियांना भेटले आणि लगेच निघूनही गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली आहे.

त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा काल मध्यरात्री घरी आले, ते अचानक घरातून निघून गेल्यामुळे कुटुंबियांची काळजी वाढली होती. त्यामुळे ३६ तासांनंतर ते काल मध्यरात्री घरी आले. पण आपल्याला आरामाची गरज आहे. काही दिवस अज्ञातवासात राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण अजून दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहोत, असे सांगून ते पुन्हा निघून गेले. ते भेटून गेल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला.

पालघर विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतर विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा फारच दु:खी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे ते फारच नैराश्यात गेले होते. त्या दु:खात ते अक्षरश: ढसाढसा रडलेही. त्यानंतर परवा मध्यरात्री कोणालाही कल्पना न देता ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर जवळपास ३६ तास ते नॉटरिचेबल होते. पण ३६ तासांनंतर ते पुन्हा घरी आले, कुटुंबियांना भेटले आणि मला आरामाची गरज आहे असे सांगून ते पुन्हा निघून गेले.

शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी (२८ ऑक्टोबर) या जागेवरून दुस-या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्याने वनगा दु:खी झाले. तिकिट कापल्यावर तर ते अक्षरश: रडायला लागले होते. एकनाथ शिंदे
यांच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासघात केल्याचा आरोपही वनगा यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR