वलांडी : हसन मोमीन
सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ज्या विवाह इच्छुक तरूण तरुणींना मात्र आपला विवाह जुळण्याची चिंता सतावत असून सध्याच्या धावत्या युगात विवाह सारख्या पवित्र बंधनाला काही वधुवर सुचक मंडळ, स्वयंघोषित एंजट मंडळीनी बदनाम केले आहे. मुलीच्या आईवडिलांना खोटी आश्वासन, स्थळ दाखविण्यासाठी पैश्याचे खुले आमिष दाखविणे, असे प्रकार होत आहेत.
शेतकरी कुटुंबातील तरूणाचे हाल हे भीक नको पण कुञा आवर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मुलींच्या आई वडिलांना पुणे, मुंबई सारख्या शहरात राहणारा आयटी कंपनीत नोकरी, स्वताचा वन बीचके, टु बीचके प्लॅट असणारा जावाई पाहिजे पण प्रत्येक तरुणीना असाच जोडीदार शक्य नाही. मुलीचे आईवडिलाकडून गावात एकञित कुटुंबात राहणा-या तरूणांना डावलले जात आहे. त्या तरूणांची मानसिकता समजून घेण्याची गरज आजच्या समाजात निर्माण होणे गरजेचे झाले आहे.
मुलींच्या आई वडिलांचे समुदेशन करण्याची वेळ आली असून याकरिता स्वतंत्र अभियान सुरूवात होणे महत्वाचे असून यामध्ये शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिक, समाजातील महत्वपूर्ण इतर घटकांचा समावेश करून मुलांच्या विवाह करीता पुढाकार व मुलींच्या आई वडिलांचे समुदेशन होणे गरजेचे आहे. तरूण तरूणीचे विवाहाचे वय वाढत चालले असून आपण आपल्या जीवनात एका विशिष्ट टप्प्यावर असताना योग्य वेळी विवाहसारखा महत्वपूर्ण अचूक निर्णय घेऊन आयुष्यात आनंदी राहु शकतो. शिक्षण, नोकरी, सर्व स्थिर स्थावर झाल्यानंतरच विवाह करावा अशा कल्पना तरूणांच्या डोक्यात बसल्या असल्यामुळे याचा ञास त्यांना करावा लागत आहे.