मुंबई : प्रतिनिधी
टीम इंडियाने अलीकडेच आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ जिंकला आहे. परंतु, यानंतर भारतीय महिला क्रिकेट टीमची सुपरस्टार स्मृती मानधनाला मोठा धक्का बसला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये तिचे वर्चस्व आता संपले आहे.
फायनलमध्ये पराजित झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्•ला फायदा झाला आहे. रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. मानधनासोबतच इतर भारतीय महिला खेळाडूंनाही चांगला फायदा झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्•ने सेमीफायनल आणि फायनलमध्ये शतकी कामगिरी केली होती. त्याचा फायदा आता तिला आयसीसी रँकिंगमध्ये मिळाला आहे. २ स्थानांच्या वाढीसह ती आता नंबर १ वर पोहोचली आहे. तर, दीर्घकाळ पहिल्या स्थानावर असलेली स्मृती मानधना आता दुस-या क्रमांकावर दिसत आहे. एश्ले गार्डनर आता तिस-या स्थानावर आहे.
सेमीफायनल आणि फायनलमध्ये स्मृती मानधना आपली फलंदाजी झळकवण्यात अपयशी ठरली होती. सेमीफायनलमध्ये शतक ठोकलेली जेमिमा रोड्रिग्ज ९ स्थानांच्या वाढीसह टॉप १० मध्ये पोहोचली आहे. तर कर्णधार हरमनप्रीत कौर ४ स्थानांच्या वाढीसह १४ व्या क्रमांकावर दिसत आहेत. २१ व्या क्रमांकावर असलेली दीप्ती शर्मा आता ३ स्थानांच्या वाढीसह वर गेलेली आहे. तर ४ स्थानांच्या वाढीसह ऋचा घोष ३० व्या क्रमांकावर दिसत आहे.
फायनलमध्ये गोलंदाजी आणि बॅटिंग दोन्हीमध्ये जोरदार कामगिरी करणारी दीप्ती शर्मा आता ऑलराऊंडर रँकिंगमध्ये नंबर ४ वर पोहोचली आहे. तिला १ स्थानाचा फायदा झाला आहे. त्याशिवाय टॉप २० मध्ये आणखी कुठलीही भारतीय खेळाडू नाहीत. गोलंदाज रँकिंगमध्ये दीप्ती शर्मा ५ व्या स्थानावर टिकून आहेत. तर टॉपवर सोफी एक्लेस्टोनचे वर्चस्व कायम आहे. आपला पहिला वर्ल्ड कप खेळणारी श्री चरणीला ७ स्थानांचा फायदा झाला आहे, ज्यामुळे ती २३ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. रँकिंगमध्ये अलीकडे मोठा बदल दिसून आला आहे.

