30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरवर्षभरात १ कोटी ७२ लाखांचा मद्यसाठा जप्त

वर्षभरात १ कोटी ७२ लाखांचा मद्यसाठा जप्त

लातूर : विनोद उगीले
जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणा-या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षी  प्रमाणेच यश आले आहे.Þ २०२३-२४ या वर्षभरात तब्बल १ कोटी ७२ लाख २८ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तसेच वाहनांचा समावेश आहे, तर यावर्षी सर्वाधिक असे ७८२ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात दारूवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात येत असल्याने त्या तुलनेने बनावट दारू कमी दरात सहज उपल्बध होत असल्याने तीच तळीरामांच्या घशात ओतन्याचे काम अवैध दारू विक्रते जिल्ह्यात करीत आहेत. तसेच लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक,तेलंगणा व आंध्रपद्रेशात ही मोठ्या प्रमाणात कर चुकवून मद्याची चोरटी वाहतूक केली जातेÞ. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२२-२३ मध्ये ७१८ वारस व ३७ बेवारस गुन्हे दाखल करून दोन कोटी ६१ लाख २५ हजार ७३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होताÞ, तर यावर्षी ७४८ वारस व ३४ बेवारस गुन्हे दाखल करून १ कोटी ७२ लाख २८ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेÞ यामध्ये तब्बल ९२ वाहनांचा समावेश असून, गतवर्षीच्या तुलने जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ८८ लाख ९७ हजार १४४ रुपयांची तफावत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR