40 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeसोलापूरवळसंगकरांच्या रुग्णालयात मनीषाची काळी जादू

वळसंगकरांच्या रुग्णालयात मनीषाची काळी जादू

सोलापूर : प्रतिनिधी
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा या काळी जादू करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर आरोपी मनीषाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मनीषाबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात ब-याच गोष्टी सुरू होत्या. ज्याचा शिरीष वळसंगकर यांना वैताग आला होता. रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयांत त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. मनीषा या काळी जादू देखील करत असल्याचा संशय आम्हा सगळ्यांना होता.
अमावास्येच्या दिवशी मनीषा माने ऑन ड्युटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या. तसेच येताना लिंबू आणि बाहुल्या सोबत घेऊन यायच्या. त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाहुल्या रुग्णालयात ठेवून कामाला जायच्या, अशी माहिती डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वळसंगकरांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चौकशी होणार
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. वळसंगकर यांचे पुत्र आणि सुनेला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मनीषा मुसळे या महिलेचीच चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता वळसंगकर यांच्या कुटुंबाचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR