33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeसोलापूरवाखरीतील 'एमआयटी 'मध्ये पावणे दोन लाखाची चोरी

वाखरीतील ‘एमआयटी ‘मध्ये पावणे दोन लाखाची चोरी

पंढरपूर / तालुका प्रतिनिधी

वाखरी येथे पालखी तळालगत असलेल्या एम.आय.टी. विश्वशांती गुरूकूल संकुलातील अकाऊंट विभागाच्या केबिन आणि कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी १ लाख ८० हज़ार ३२५ रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्राचार्य शिवाजी गवळी (रा. माजलगांव) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

विश्वशांती गुरूकूल संकुलाचे व्यवस्थापक सुनिल नागूर हे शाळेत आले असता त्यांना अकौंट विभागाची केबीन व आतील कपाटाचे लॉक तुटलेले दिसून आले. याबाबत त्यांनी प्राचार्य गवळी यांना कळविल्यानंतर त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुल्कापोटी भरलेले १ लाख ८० हज़ार ३२५ रूपये कपाटात ठेवलेले होते. रात्रीत चोरट्यांनी लॉक़ तोडून ही रक्कम चोरून नेली.

याबरोबरच चोरट्यांनी संकुलातील व्हीआयपी क्वॉर्टर, कनिष्ठ महाविद्यालयातील अकौंट विभागाची केबीन व कपाटांचे लॉक तसेच प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या केबीनसह कपाटेही उचकटली आहेत. या घटनेनंतर संकुलातील सीसीटीव्ही फुटेज़ तपासले असता तोंडाला कापड बांधून चोरी करताना चार चोरटे दिसत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR