27 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeवाढत्या गोल्ड रिझर्व्हमुळे सोने खरेदीचा दर वधारला; चीनकडून दरमहा ५ टन खरेदी; भारताकडे ८८०...

वाढत्या गोल्ड रिझर्व्हमुळे सोने खरेदीचा दर वधारला; चीनकडून दरमहा ५ टन खरेदी; भारताकडे ८८० टन साठा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोन्याच्या वाढत्या दरामागे लोकांद्वारे सोन्याची खरेदी हे कारण नसून मोठ-मोठ्या देशांद्वारे सोन्याचा साठा वाढवणे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या २ ते ३ वर्षात अनेक देशांच्या रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. सर्वाधिक सोने खरेदीत चीनचे नाव टॉपवर आहे.

चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने २०२५ मध्येही सोने खरेदी सुरुच ठेवली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनने ३९.२ टन सोने खरेदी केले आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चीनच्या जवळ एकूण २,२९८.५ टन सोने जमा झाले आहे. चीनने गेल्या ११ महिन्यात ब्रेक न घेता सोने खरेदी सुरु ठेवली आहे. दर महिन्यास सरासरी २ ते ५ टन सोने खरेदी चीन करत आहे.

डॉलर केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर टिकून आहे. परंतू सोने कोणा देशाच्या चलनावर अवलंबून नाही. त्यामुळे त्याला सुरक्षित पर्याय मानले जात आहे. दुसरे कारण आहे जगात वाढत चाललेला तणाव आणि अनिश्चतेचे वातावरण; तिसरे मोठे कारण म्हणजे वाढती महागाई आहे. २०२५ मध्ये सोन्याची किंमत सुमारे ३,९०० डॉलर प्रति औंसापर्यंत पोहचली होती. जेव्हा वस्तूंचे दर वाढतात, तेव्हा सोने त्याची किंमत कायम ठेवते आणि पैशांच्या ताकदीला कोसळण्यापासून वाचवते.
चौकट
भारतही सोन्याच्या प्रेमात
भारताचा विचार करता आरबीआयच्या जवळ देखील मोठा सोन्याचा साठा आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताकडे ८८० टन सोने जमा आहे. यात सुमारे ५१२ टन सोने देशातील नागपूर आणि मुंबईच्या आरबीआयच्या तिजोरीत ठेवले आहे. उर्वरित सोने विदेशी बँकांकडे ठेवले आहे. उदा. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, भारताचा एकूण विदेशी चलनसाठ्यात सोन्याचा वाटा ११.७ टक्के इतका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR