वाढत्या ‘स्क्रीन टाईम’चा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम

मुंबई : प्रतिनिधी
मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर जास्त वेळ घालवणा-या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो आणि वर्तणुकीतील समस्यांमध्येही वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख घटक आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वाढता स्क्रीन टाईम थेट मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. डिजिटल कंटेंट मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सतत सक्रिय ठेवतो, ज्यामुळे डोपामाईनचे प्रमाण वाढते आणि मुलांना सतत उत्तेजनाची सवय लागते. दर महिन्याला ४ ते १४ वयोगटातील सुमारे ८ ते १० मुलांमध्ये आक्रमकपणा, चिडचिड होणे, झोपेच्या तक्रारी, एकाग्रतेचा अभाव आणि एकाकीपणा अशा समस्या उद्भवत आहेत.
वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांची त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. संवाद कमी झाल्याने भाषेच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच, सायबरबुलिंग किंवा चुकीच्या ऑनलाईन कंटेंटमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि कुटुंबातील तणाव वाढू शकतो. मात्र, वेळीच उपचार केल्यास मुलांच्या वर्तणुकीत सुधारणा शक्य आहे. जाणून घ्या पॅरेंटिंग टिप्स –

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
२ वर्षांवरील मुलांचा स्क्रीन टाईम दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवावा, दररोज किमान ४५ मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायामाला प्रोत्साहन द्यावे, जेवताना तसेच झोपण्यापूर्वी खोलीत मोबाईलचा वापर टाळा, मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्या, गरज असल्यास समुपदेशन किंवा वर्तणुकीसंबंधित उपचार घ्या.

पालकांकडून मानसिक आधार गरजेचा
मुलांच्या वर्तणुकीत बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्क्रीनचा मर्यादित वापर, सक्रिय जीवनशैली आणि पालकांकडून मानसिक आधार मिळाल्यास मुलांचे मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य सुरक्षित राहते. वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलं आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागतात, अभ्यासात मागे पडतात आणि गॅझेट्स हातातून काढून घेतल्यावर संताप व्यक्त करतात. दर महिन्याला ४ ते ५ मुले ही एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, कल्पनाशक्तीचा अभाव आणि कुटुंबीयांशी कमी संवाद अशा तक्रारींसह येतात. यामुळे वेळीच पालकांनी लक्ष द्यावे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news