24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्यावाढीव गृहकर्ज, महागाईचे ओझे ग्राहकांवर ‘जैसे थे’

वाढीव गृहकर्ज, महागाईचे ओझे ग्राहकांवर ‘जैसे थे’

रेपो रेटमध्ये बदल नाही; बांधकाम क्षेत्रात नैराश्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांची पुन्हा घोर निराशा केली. आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. ग्राहकांना वाढीव गृहकर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यासोबतच त्यांना महागाईच्या झळा पण सहन कराव्या लागणार आहेत. गेल्या १० वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. आता रेपो दर ६.५ टक्के इतका आहे.

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो दरात कपातीचे संकेत दिले होते. त्यामुळे यावेळी ग्राहकच नाही तर रिअल इस्टेट आणि शेअर बाजाराला आरबीआय व्याजदर कपातीचा निर्णय घेईल असे वाटत होते. पण गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांना निराश केले. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २.५० टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बांधकाम क्षेत्रात निराशा
भारतीय बांधकाम क्षेत्राला एका बुस्टरची गरज आहे. केवळ काही शहरात महागड्या मालमत्तांची विक्री होत आहे. अब्जाधीश आणि नवीन लक्षाधीशच असे व्यवहार करत आहेत. दुसरीकडे मध्यमवर्गावर विविध करांचे ओझे वाढले आहे. प्रामाणिक करदात्यांना केंद्र सरकारने कायम दुय्यम वागणूक दिल्याने हा वर्ग नाराज आहे. त्यातच हा वर्ग महागाई आणि ईएमआयच्या हप्त्यात सर्वाधिक भरडल्या जात आहे. या वर्गाला दिलासा देणारी एकही मोठी योजना देशभरात लागू नाही. त्यातच आता ईएमआय कमी होणार नसल्याने त्यांना वाढीव ईएमआयचे ओझे वाहून न्यावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR