22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरवालवड येथे मोफत आरोग्य तपासणी

वालवड येथे मोफत आरोग्य तपासणी

बार्शी: तालुक्यातील वालवड येथे शंभू महादेव ज्ञान प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शंभू महादेव ज्ञान प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था वालवड अखंड हरिनाम सप्ताह वालवड वर्ष ३८ निमित्त सालाबादप्रमाणे सलग पाचव्या वर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील नागरिक पंचक्रोशीतील भाविक भक्त विशेषतः जेष्ठ नागरिक मोफत आरोग्य शिबिरात जवळजवळ अडीचशे ते तीनशे पेशंट यांना औषध उपचार मोफत तपासणी देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन जनरल फिजिशियन /सर्जन डॉ. रणजित हनुमंत जाधवर पाटील यांच्या पत्नी त्वचारोग तज्ञ डॉ. मोनिका केदार -जाधवर पाटील, दंतरोग तज्ञ डॉ. तृप्ती पाटील यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत वेळ देऊन मोफत औषध वाटप करून पेशंटची तपासणी केली. यावेळी बार्शी तालुक्याचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी माजी मुख्याध्यापक हनुमंत जाधवर पाटील सर, ग्रामपंचायत सदस्य शकुंतला पाटील, महाराष्ट्र पोलीस कांचन जाधवर पाटील, त्यांचे पती महाराष्ट्र पोलीस शशिकांत दराडे, कृषी अधिकारी संतोष दराडे,चुलते अंगद जाधवर, राजेंद्र जाधवर सर, सामाजिक

कार्यकर्ते पंडित पाटील, उद्योजक श्रीराम जाधवर, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक संतोष जाधवर, ज्ञान प्रबोधनी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता उद्योजिका सौ. मनीषा जाधवर- पाटील दराडे, संचालक मंडळातील सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधवर, उमेश मुंडे सर, सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधवर, धनाजी भालेराव सर उपस्थित होते. रुग्णसेवा ही ईश्वरी सेवा या उद्देशाने सेवाभावी वृत्तीने वालवड येथील आरोग्य शिबीर पार पडले. तसेच २०१७-१८ पासून संस्थेतर्फे ग्रामीण मुलांच्या सर्वांगीविकासासाठी मोफत शिकवणी साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, गुणवत्ता विकासासाठी टॅलेंट सर्च परीक्षा असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे राबवण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR