27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरवाला शिवारातून ५३ लाखांचा गांजा जप्त

वाला शिवारातून ५३ लाखांचा गांजा जप्त

रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून ५३  लाख ८० हजार ६५०  रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजा  स्थानिक गुन्हे शाखेने सोमवार दि . ११ नोव्हेबर २०२४ रोजी जप्त केला आहे .
रेणापूर तालुक्यातील वाला शेत शिवारात गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या  मार्गदर्शनात, परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने वाला शिवारातील प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या शेतात छापा टाकून गांजाची ३५८ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात केली असून या गुन्हयातील अरोपी  प्रेमदास पांडुरंग पवार, वय ४८  वर्ष, रा . फरदपूरतांडा ( ता. रेणापूर) यांच्या विरुद्ध  स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विंश्वभर पल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या कारवाईत परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वभर पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, सुधीर कोळसुरे, नाना भोंग, मोहन सुरवसे, संजय कांबळे, युवराज गिरी, सचिन धारेकर, सिद्धेश्वर जाधव, नितीन कठारे, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, चालक पोलिस अमलदार मुंढे ,पाटील, फोटोग्राफर सुहास जाधव यांचा सहभाग होता. या  गुन्ह्याचा अधिक तपास रेणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, मदतनीस पोलिस अमलदार अभिजीत थोरात हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR