23.3 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा

वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेग आला असून खंडणी ते खुनापर्यंत संबंध असल्याचा आरोप असणा-या वाल्मिक कराडच्या संपत्तीविषयी रोज नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय आल्यानंतर वाल्मिक कराडच्या स्वत:च्या नावावर किती संपत्ती आणि दुस-याच्या नावावर किती हे कोण शोधणार असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

वाल्मिक कराड एवढे दिवस फरार होता. या दरम्यान वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचा तपास ईडीने करायला हवा. आणि त्यावर कारवाई करायला हवी. सरकार या संपूर्ण प्रकरणात पक्षपातीपणे वागत असल्याचेही दानवे म्हणाले. इतर वेळी लहानसहान बाबतीतही कारवाई करणारी ईडी हजारो, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणा-या वाल्मिक कराडला साधी नोटीसही देत नाही. यावर साधा तपास करत नाही. त्यामुळे या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम असल्यासही अंबादास दानवे म्हणाले.

ग्राहकांच्या खिशाला कात्री
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एसटी बसची भाडेवाढ यावरही अंबादास दानवे बोलले. एसटी भाडेवाढ संदर्भात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. याविरोधात शिवसेना आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR