16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरविकास कामांमुळेच मिळाली अधिकृत उमेदवारी

विकास कामांमुळेच मिळाली अधिकृत उमेदवारी

चाकूर : प्रतिनिधी
अंतेश्वर उपसा सिंंचन योजना ही आपली ड्रीम प्रोजेक्ट असून जनतेचा संपर्क व मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मला महायुतीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत महायुतीच्याच सरकारला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. ते दैनिक एकमतशी बोलत होते.
आमदार पाटील यांनी चौफेर विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मतदारसंघात अडीच हजार कोटींपेक्षा अधिक रूपयाची विविध विकासकामे केली असून समाजाच्या हितासाठी विकास कामाशिवाय पर्याय नसल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठींबा दिला. मतदारसंघाचा प्रारुप विकास आराखडा तयार केला असून अवर्षणप्रवण असलेल्या मतदारसंघाची ओळख बागायतदार म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न आहेत. आगामी काळात बारामतीच्या पावलावर पाऊल टावून अहमदपूर मतदारसंघाचा विकास करणे हेच आपले स्वप्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या आमदारकीच्या २००९ ते २०१४ याकालखंडात मन्याड नदीवरील उपसा जलंिसंचन योजना मार्गी लावली यामुळे अडीच हजार एकर जमीन सिंंचनाखाली आली. २०१९ च्या दुस-या आमदारकीच्या कालखंडात मन्याडनदीवरील ८ बराजचे काम झाले असून यामुळे तीन एकर जमीन सिंंचनाखाली येणार आहे तर भविष्यातील आता २०२४ च्या तिस-या आमदारकीच्या कालखंडात अंतेश्वर उपसा जलंिसंचन योजनेमुळे दहा हजार एकर जमीनीचे क्षेत्र जलंिसंचनाखाली येणार आहे. या योजनेत गोदावरी नदीचे अतिरीक्त दोन टीएमसी वाहून जाणारे पाणी मतदारसंघात वळविण्यात येणार आहे. यामुळे मतदारसंघातील कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नद्या जोड प्रकल्पाप्रमाणे तलाव जोड ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
आमदारकीच्या कालखंडात अहमदपूर व चाकूरला ट्रामा केअर युनिट उभारणी करण्यात येत आहे. अहमदपूरला उपजिल्हारुग्णालयाची मंजूरी मिळवली. सर्वच क्षेत्रात काम करताना जातीभेद केला नाही. गुणवत्तेच्या आधारावर सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. मराठा आरक्षणाबाबत आमदार म्हणून राजभवनाला कुलूपबंद केले. सरकारला आरक्षणावर सकारात्मक निर्णय घ्यावयास भाग पाडले. यामुळे मराठा समाजातील ५४ लाख नागरिकांना यांचा फायदा मिळणार आहे. आतापर्यंत कोणत्याही सरकारने मराठा आरक्षणावर सकारात्मक विचार केला नव्हता मात्र महायुती सरकारने खुप मोठा बदल घडवला आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही रास्त भूमिका आहे.  लाडकी बहीण योजनामुळे महायुती सरकारची महीला सशक्तीकरण प्रकल्प घरोघरी पोहोचला. महीला या संसारात काटकसर करुन बचत करतात. ही आर्थिक काटकसर फायद्याची ठरणार आहे. भविष्यात चाकूरच्या एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावणार असून यासाठी २६५ एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
शैक्षणिक बाबतीत सर्वच शाळा डिजीटल बनविण्याची संकल्पना आहे. ग्रामीण भागातही इयत्ता ८ वी पासून विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा संवाद घडवून विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध केला आहे. मतदारसंघातील सर्व बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. यामुळे नागरीकांना प्रवासाची अडचण दूर होऊन प्रवास सुखाचा होणार आहे. दूरदृष्टी ठेवून विकासात्मक राजकारण केल्याने मोठा विश्वास संपादन केला आहे म्हणूनच पुन्हा मतदार संधी देतील, असा विश्वास आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR