40.1 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeलातूरविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रेणापूर : प्रतिनिधी
विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगरात रविवारी दि २६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. त्याच्या सोमवारी सकाळी अन्त्यविधी करण्यात आला . रविवारी सायंकाळी नळाला पाणीआले होते. नळाचे पाणी भरण्यासाठी किरण कांबळे यांनी नळाला विद्युत मोटार लावली. त्यासाठी वायर लावताना विजेचा जब्बर धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळला असता कुटुंबातील मंडळीसह गल्लीतील नागरिकांनी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मृत झाल्याचे घोषित केले. कुटुंबातील कर्ता व्यक्ती व आस्कमात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे .त्याच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. येथील पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR