28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रविटांनी भरलेला ट्रक उलटला,५ ठार

विटांनी भरलेला ट्रक उलटला,५ ठार

अकोला : प्रतिनिधी
अकोल्यात विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना अकोला-मंगरूळपीर रोडवर दगडपारवा गावाजवळ आज घडली. विटांचा ट्रक उलटल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ माजली.

अकोल्यात गडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला. या घटनेत अनेकजण विटांच्या ढिगा-याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR